छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एक छोटीशी सेवा या मावळ्यांकडून अर्पण.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एक छोटीशी सेवा या मावळ्यांकडून अर्पण.

 पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. 

गडकिल्ल्यांवर होणा-या अपघातामुळे जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे गडावरुन खाली आणता यावे , यासाठी अत्याधुनिक फोल्डेबल स्ट्रेचरची मागणी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठाणकडून रोटरी क्लब , सिंहगड रोड, पुणे यांच्याकडे केली होती.  ती मंजुर करण्यात आली, आणि 
सदर फोल्डेबल स्ट्रेचर्सचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 18/3/2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता माती गणपती चौक , नारायण पेठ, पुणे येथील डॅा. मनोज देशपांडे सर यांच्या क्लिनिकवर करण्यात आला.
याअगोदरही  पाच  स्ट्रेचर्स रोटरी क्लब, सिंहगड रोड, पुणे यांच्याकडून देण्यात आली होती , ती रायरेश्वर,केंजळगड,राजगड, तोरणा,शिवनेरी या महत्त्वाच्या गडांवर वितरित करण्यात आली होती.  परंतु  लवकरच आमच्या लक्षात आले , की हॅास्पिटलमध्ये पेशंटला स्ट्रेचर घेऊन जाणे वेगळे; व गडावरुन खाली घेऊन येणे वेगळे. त्याचबरोबर स्ट्रेचरची लांबी व वजन या महत्त्वाच्या समस्या होत्या. याबद्दल आमचे मित्र , पेशाने डॉक्टर व गडप्रेमी डॅा. मनोजराजे गायकवाड सरकार व भोरमधील सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिनभाऊ देशमुख यांच्याशी चर्चा केली.  त्यातून पुढील वैशिष्ट्ये असलेला स्ट्रेचर फायनल झाला. 
1. वजनाने हलके परंतु मजबूत मटेरियल.
2.रायरेश्वर मंदिर व शिडी यांच्यामधील अंतर लक्षात घेऊन स्ट्रेचरला व्हील लावले आहेत. त्यामुळे आरामात फक्त एक व्यक्ती सहजपणे पेशंटला मंदिरापासून शिडीपर्यत घेऊन जाईल.
3.स्ट्रेचरचा कलर भगवा घेतला त्यामुळे रक्त लागले तरी खराब दिसणार नाही.
4.स्ट्रेचर फोल्डेबल केले. त्यामुळे एका जागेवरून दुसरीकडे  सहज नेण्यासाठी मदत होईल .
5.स्ट्रेचरला सुरक्षित ठेवण्यासाठी एक बॅग, जी आपण पाठीला अडकऊनसुद्धा घेऊन जाऊ शकतो.
6.पेशंट हालू नये यासाठी स्ट्रेचरला  पट्टे लावले आहेत, जे आपण हवे तसे कमीजास्त प्रमाणात आवळू शकतो.
7. स्ट्रेचरवर टाकण्यासाठी एक शीट ज्यामुळे स्ट्रेचरला रक्त लागून खराब होणार नाही.यानंतर सुरू झाला वरील वैशिष्ट्ये असलेल्या स्ट्रेचरचा शोध . काही ठिकाणी मिळालेसुद्धा.  परंतु त्यांच्याकडे जसे आहे तसेच घ्यावे लागत होते;  व खराब झाले तर सर्व्हिस मिळणार नाही म्हणत होते. यात मदतीला धावून आले , आमचे मित्र , सावंत सर्जीकल या कंपनीचे मालक श्री.अभिलाष सावंत सर. सरांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या व ते आम्हाला हवे तसे स्ट्रेचर बनवून द्यायला तयार झाले ते म्हणाले, किती स्ट्रेचर्स हवी आहेत?  मी म्हणालो,पाच. ते म्हणाले - पाच नाही, सहा देतो. सहावे स्ट्रेचर आमच्याकडून. छत्रपतींच्या चरणी अर्पण त्यानंतर काही दिवसांपूर्वी श्री. अभिलाष सावंत यांनी स्ट्रेचर मागवून त्यात आम्हांला हवे तसे बदल करुन शनिवारी दिले. वरील सहा स्ट्रेचर्स रायरेश्वर, राजगड, रोहिडा, शिवनेरी, सुधागड व रेसेकुटिम भोर येथील उपस्थित प्रतिनिधी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. पुढील दोन आठवड्यांत ठरलेल्या गडांवर ती पोचवली जातील.  त्यांचा प्रायोगिक तत्त्वावर पुढील वर्षभरासाठी वापर सुरू केला जाईल . यात अजून काही दोष समोर आले तर ते सुधारून पुढील वर्षी सर्व गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावातील पोलीसपाटील यांच्याकडे सोपविण्यात येतील.त्या आधी गडघे-यातील ज्या गावात स्ट्रेचर देण्यात येणार आहे, तेथील पाच तरुण व तरुणींना प्राथमिक उपचार कसे द्यायचे, याचे प्रशिक्षण डॉक्टर व गडप्रेमी डॅा. मनोजराजे गायकवाड सरकार व टीम पुणे येथे एकत्रित मेळावा आयोजित करुन एकदिवसीय प्रशिक्षण देणार आहेत.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब,सिंहगड रोड, पुणेचे पदाधिकारी.अध्यक्ष श्री. सतीश खाडे,सचिव श्री . रमाकांत जाधवआणि डॉ. मनोज देशपांडे, डॉ. अपर्णा देशपांडे,सौ स्वाती जाधव, श्री शरद लागू , श्री सुहास कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद देण्यासाठी:-  डॉ. अश्विनी घोरपडे गजेंद्रगडकर, वरिष्ठ समाजशास्त्रज्ञ म्हणून बायफ एनजीओ (लेप्रसी व आदिवासी यांच्याबरोबर काम केल्याने आदिशक्ती व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित) .सौ अनुराधाताई घोरपडे ,
संस्थापक सदस्य, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठाण .
श्री दिपक दत्तात्रय घोरपडे,संस्थापक सदस्य, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठाण .सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उपस्थित व्यक्ती:-श्री. प्रशांतजी थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.श्री महेन्द्र भाऊ देवघरे ,
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेवक .श्री विशाल सुरेश जाधव,बा रायगड परिवार, महाराष्ट्र राज्य.श्री सुनिल जंगम,रायरेश्वर ग्रामस्थ संस्था.श्री दर्शनजी वाघ . आदि मान्यवर उपस्थित राहिले होते.
त्याचबरोबर प्रत्येक गडावर स्ट्रेचर पोचवण्याची जबाबदारी घेतलेले मावळे..
राजगड--श्री. कुणाल भोसले
रोहिडा -- श्री. दर्शनजी वाघ
शिवनेरी--श्री. दर्शनजी वाघ
रायरेश्वर-- श्री. शंकर जंगम
सुधागड-- श्री. संजयजी करपे
रेसेकुटिम भोर -- श्री. सचिन देशमुख   🙏🚩
दिपक दत्तात्रय घोरपडे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.