गुंडेवाडी येथे दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शानदार शुभारंभ.

गुंडेवाडी येथे दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शानदार शुभारंभ. 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 गेली पन्नास वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गुंडेवाडी मराठा नगर तालुका खटाव येथील मायणीच्या सनगर वस्ती जवळून जाणाऱ्या काळ ओढ्यावर दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ येथील सरपंच प्रतिनिधी शरद निकम यांच्या हस्ते झाला यावेळी खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजाराम कचरे डॉक्टर सुशांत देशमुख मधुकर कचरे राजू झगडे एडवोकेट सुरज पाटील विकास अधिकारी एम एन जाधव यांची प्रमुख यांची उपस्थिती होती यावेळी शरद निकम म्हणाले की गुंडेवाडी हे गाव येरळा नदीच्या काठी असले तरी पूर्व भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते ही गरज लक्षात घेऊन   डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी या ओढ्यावर 22 लाख व दुसरा बंधारा 15 लाख या कामांना शासकीय मंजुरी मिळवली त्या कामाचा आज प्रत्यक्ष शुभारंभ होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे यावेळी आपल्या भाषणात डॉक्टर दिलीपराव येळगावकर म्हणाले की टेंभूचे पाणी खटाव मानला मिळणे शक्य नाही कारण पाण्याचे वाटप झाले होते ज्या जिल्ह्यात धरण असते त्या जिल्ह्याचा त्या पाण्यावर प्रथम हक्क असतो या न्यायाने हायकोर्टातून टेंभूच्या पाण्याला मंजुरी मिळवली युती शासनाच्या काळात नामदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष निधी देऊन हे काम पूर्ण झाले या टेंभूच्या पाण्याचा सोळा   गावांना खटाव तालुक्यात व सोळा गावांना माण तालुक्यात फायदा होणार आहे आता या पाण्यावर 24 बाय सात पिण्याच्या पाण्याची योजना आम्ही कार्यान्वित करणार आहे आम्ही केवळ आश्वासन देत नाही तर शब्द पुरा करतो माझ्याकडे कोणतीही राजकीय सत्ता नसताना पाणी प्रश्न सोडवण्याची मी काम केले आहे याचा मला अभिमान आहे यावेळी डॉक्टर येळगावकर यांचा नागरिक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास गणेश थोरात गणेश निकम रणजीत निकम गजानन निकम विश्वनाथ हवलदार संतोष निकम चंद्रकांत निकम  तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी रणजीत निकम यांनी आभार मानले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.