सोमंथळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम जन्म सोहळा उत्साहात संपन्न.

सोमंथळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम जन्म सोहळा उत्साहात संपन्न.

फलटण प्रतिनिधी, अमोल मदने.

ग्रामदैवत सोमंथळी फलटण येथील दक्षिण मुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते .या मारुतीला नवश्या मारुती म्हणूनही संबोधले जाते आज दि.३० या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा संपन्न होत असताना सद्गुरु गोंदवलेकर महाराज जप संकुलन यांच्याकडून अखंड २५तास रामनाम जप २९- ३ -२०२३सकाळी ११ वाजेपासून ३० -३- २०२३ दुपारी बारापर्यंत अखंड २५ तास रामनाम संपन्न विना  पहारा सुरू करून रामनवमीचा राम जन्म सोहळा हजारोंच्या उपस्थितीत संपन्न हनुमान जयंती पर्यंत अनेक संत महात्मे यांचे प्रवचन कीर्तन त्याचबरोबर उत्सव साजरा होत आहे .या दक्षिणमुखी मारुतीचा जन्म पौर्णिमेला झाला असल्याने दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे .ती ग्रामस्थांनी तशीच परंपरागत चालू ठेवली आहे ६- ४ -२०२३ पहाटे चार ते सहा या वेळेत संगीत व भजन सहा वाजून २५ मिनिटांनी गुलाल पुष्पांच्या उधळणीत हनुमान जन्मोत्सव सकाळी आठ ते नऊ या वेळेत गाव प्रदक्षिणा दुपारी तीन ते सहा कावडी, काठी मिरवणूक रात्री ९ ते ११श्रींचा छबिना मिरवणूक होणार आहे.शुक्रवारी ता.७ सकाळी दहा ते तीन पर्यंत लोकनाट्य तमाशा कार्यक्रम व दुपारी ४ ते ६ यावेळेस जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले आहे .या हनुमान जन्मोत्सवाचा लाभ तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.