राजवंश आठवडा बाजार संघटनेने दिली आठवडा बाजार करणाऱ्या मृत व्यक्तीच्या कुटुंबास ५० हजार रुपयाची मदत.
कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.
पाचवड - गेले कित्येक वर्षे राजवंश आठवडा बाजार संघटना ही आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना असून काही दिवसांपूर्वी मंगळवार पाचवड आठवडे बाजारात खोलवडी येथील असणारे व तरकारी विकणारे चंदू माने यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात हालाखीचे जीवन जगत असताना चंदू माने यांचे कुटुंबीय वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत आहे याच अडचणींना काहीशा प्रमाणात मदत व्हावी म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेने कोरेगाव तालुक्यातील विविध आठवडे बाजारामध्ये पैसे गोळा करून तब्बल ५० हजार रुपये इतकी मोठी वर्गणी गोळा केली.ही वर्गणी गोळा करण्यामध्ये संभाजी पिसाळ, विनोद पवार, जालिंदर शिंदे, संदीप यादव, सुनील निदान, दिलीप चव्हाण, शत्रुघ्न यादव, मंगेश गार्डी, मंगेश जाधव यांचा सिंहाचा वाटा मानला जातो.
चंदू माने या गरीब तरकारी विक्रेत्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून ही झालेली ५० हजार रुपयांची मदत त्यांना डोंगराएवढी वाटली व खोलवडी गावच्या सरपंचांचे व चंदू माने यांच्या कुटुंबाचे मन अगदी या मदतीने भारावून गेले, झालेल्या या मदतीमुळे त्यांचे अक्षरशः तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते.
राजवंश आठवडा बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंदू माने यांच्या खोलवडी येथील निवासस्थानी जावून त्यांना ५० हजार रुपयाची रोख रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त केली यावेळी मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजार करणारे व्यापारी व खोलवडी गावचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment