करारशेतीचे नवीन करार चैत्र पाडव्याच्या मुहूर्तापासून - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

करारशेतीचे नवीन करार चैत्र पाडव्याच्या मुहूर्तापासून  - येस ग्रुप संस्थापक  संजय भगत. 

     पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  


  जाखणगाव तालुका खटाव येथे चैत्र पाडव्यापासून सोयाबीन, घेवडा पिकाच्या करार शेतीचे करार करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून करार शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला असून यावर्षी शेतकऱ्यांना  मुदतपूर्व बँक खात्यावरती रकमा जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकाला पेढे भरून आनंद व्यक्त केला हीच येस ग्रुपच्या करारशेतीची यशाची पोहोच असल्याचे मत येस ग्रुपचे संस्थापक  संजय भगत यांनी  व्यक्त केले.येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी तसेच मदर अर्थ हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येस ग्रुपच्या माध्यमातून करार शेती योजना राबवली जात असून या योजनेतील शेतकऱ्यांचे सोयाबीन व घेवडा या शेतमालाची पुर्नखरेदी वेळेत करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला याप्रसंगी श्री. संजय भगत बोलत होते यावेळी कंपनी सचिव अरविंद विधाते, उपाध्यक्ष सौ. सारिकाताई शिंदे, संचालक श्रीकांत लावंड यांची प्रमुख उपस्थिती होते करारशेती हा शेतीतला फार मोठा आधार असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट खिशात "रास्त नवे तर जास्त दर" देण्याची संकल्पना येस ग्रुपने राबवली असून यामध्ये शेतकऱ्यांना वाढीव दर मिळत असल्यामुळे करार शेतीत सहभागी झालेला शेतकरी  समाधानी दिसून आले गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांची करार करण्याची संख्या जरी वाढली असली तरी मर्यादित क्षेत्रावर करार शेतीचा कार्यक्रम राबवला जाणार असून जुन्या शेतकऱ्यांना व कंपनी सभासदांना प्राधान्य दिले जाईल असे श्री संजय भगत म्हणाले यावेळी कंपनी सचिव अरविंद विधाते म्हणाले शेतकऱ्यांना हमीभाव मिळत असल्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून शेतकरी आर्थिक प्राप्ती करून घेत आहे व तो बाजारभावापेक्षा ज्यादा दर मिळत असल्यामुळे समाधानी आहे यापुढे वेगवेगळ्या योजना कंपनीच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही श्री विधाते यांनी केले.यावेळी सोमनाथ शिंदे, गजानन शिंदे, अविनाश शिंदे, संदीप शिंदे, सतीश शिंदे,  भगवान झगडे, बाळू झगडे आधी सभासद शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
करारशेती गौरव" पुरस्कार खातगुणच्या शेतकरी जोडप्याला - श्री. संजय भगत 2022 या वर्षाचे करारशेती गौरव पुरस्काराचे मानकरी खातगुण गावचे प्रगतशील शेतकरी सतीश लावंड व त्यांच्या पत्नी सौ विजया हे जोडपे ठरले असून यांना सोन्याचे दागिने, पैठणी ,पोशाख व 1 एकराचे करार शेतीचे बियाणे व औषधी किट बक्षीस म्हणून दिले जाणार आहे अशी अधिकृत घोषणा श्री संजय भगत यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.