लोकसेवा प्रतिष्ठान व आमदार महेश शिंदे, डॉ.प्रियाताई शिंदे युवा विचार मंच यांच्याकडून खातगुण येथे वृक्ष रोपणाचे वाटप.

लोकसेवा प्रतिष्ठान व आमदार महेश शिंदे, डॉ.प्रियाताई शिंदे युवा विचार मंच यांच्याकडून खातगुण येथे वृक्ष रोपणाचे वाटप. 

 पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

 खातगुण तालुका खटाव येथे लोकसेवा प्रतिष्ठान खातगुण व आमदार महेश दादा शिंदे व डॉ.प्रियाताई शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त उपक्रमाने खातगुण गावात विविध ठिकाणी वृक्षरोपणाचे वाटप करण्यात आले. वटपौर्णिमा सणा निमिंत्त वटवृक्षाची पूजा करायला येणाऱ्या माता भगिनींना विविध प्रकारचे वृक्ष भेट देऊन एक वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.त्यामध्येवड,चिंच,पिंपळ,पेरू,आंबा,आवळा,जांभूळ,लिंब,कडीपत्ता,सीताफळ,अशोक इत्यादी विविध प्रकारचे वृक्षचे वाटप करण्यात आले. यामध्ये जि.प.शाळा व वेदावती हायस्कूल. या शाळा देखील वृक्ष देण्यात आले.तर यावेळी उपस्थीत मान्यवर खटाव तालुका वनक्षेत्रपाल मा.श्री.राजेंद्र सातपुते,वनपाल सागर कुंभार,वनरक्षक कोळी,व श्री.योगेश लावंड पाटील,संस्थापक अध्यक्ष लोकसेवा प्रतिष्ठान,खातगुण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गावांमधील गणेश चव्हाण ,विनोद कलेती ,सचिन हिंगमिरे,विक्रम लावंड,मनोज लावंड,अनिल जाधव ,गणेश कारंडे,गुजबा लावंड ,तानाजी लावंड,बाळासाहेब आतार,सुनील लावंड उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.