रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था अंतर्गत रोजगार मेळावा उत्साहात संपन्न.

रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था अंतर्गत रोजगार मेळावा उत्साहात संपन्न.

 फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने.

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था अंतर्गत MILTON सोलर लिमिटेड कंपनीचे ट्रेनिंग व रोजगार मेळावा  गुरुवार दिनांक 25/06/2026 रोजी हॉटेल महाराज एक्झिक्यूटिव्ह संपन्न झाला यावेळी रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील महिला पुरुष रोजगार मेळाव्यासाठी आवाहन करण्यात आले होते. संस्थेच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बहुसंख्या ने  महिला व पुरुष मेळाव्यामध्ये सामील झाले.त्या वेळी मिल्टन कंपनीच्या वतीने स्पेशल ट्रेनर श्री. कुणाल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये कंपनी विषयी व सोलर विषयी सर्वांना माहिती दिली यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तरे दिली. व सर्वांचे समाधान केले त्यावेळी संस्थेच्या वतीने  संस्थापक सौ.रझिया शेख सूत्र संचालन केले मिल्टन कंपनीचे पार्टनर श्री. मुबारक शेख यांचा सत्कार श्री. अप्पासाहेब कापसे संचालक रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांनी केला. श्री मुबारक शेख यांना संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते की  तुम्ही जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग घ्या
 संस्थेच्या आव्हानाला मान देऊन  मुंबईमध्ये होणारे ट्रेनिंग त्यांनी फलटणमध्ये घेऊन जिल्ह्यासाठी मोलाचे योगदान दिले.त्यावेळी त्यांना संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच मिल्टन कंपनीच्या वतीने श्री दत्ता कोकरे मार्केटिंग पार्टनर यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी मिल्टन कंपनीच्या वतीने श्री कुणाल पाटील, MILTON कंपनीचे पाटणार श्री मुबारक शेख, मार्केटिंग पाटनर श्री दत्ता कोकरे, श्री संजय उबाळे श्री शैलेश म्हात्रे श्री विजय कांबळे श्री किरण घुगरे महिला ऑफिस स्टाफ उपस्थित होता. रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ. राझिया शेख ,संचालक श्री अप्पासाहेब कापसे  मा. प्राचार्य शाहीन  शेख  उपाध्यक्ष सचिव श्री मारुती टकले  खजिनदार श्री कैफ शेख,श्री अप्पासाहेब कापसे, श्री महेंद्र सपकाळ,श्री सतीश देसाई, मानवाधिकार फाउंडेशन भारत चे महाराष्ट्र अध्यक्ष  श्री रणधीर भोसले, श्री  बजरंग गावडे प्रगती चळवळ चे पत्रकार श्री प्रदीप सस्ते , त्यावेळी उपस्थित होते.संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सौ.रझिया शेख यांनी मिल्टन कंपनीचे व उपस्थित बहुसंख्य लोकांचे आभार मानण्यात आले. खूप महिला पुरुष यांना नोकरीची संधी मिळाली   झाला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.