भारतीय पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संदीपकुमार जाधव यांची नियुक्ती.

भारतीय पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संदीपकुमार जाधव यांची नियुक्ती.

फलटण तालुका प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल.

 असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट (AIJ) अर्थात भारतीय पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवा पत्रकार तथा प्रसिद्ध चित्रकार दै. वसंत सागरचे कार्यकारी संपादक संदीपकुमार कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम. एस. शेख, लीगल विंगचे प्रदेश अध्यक्ष ॲड.कैलास पठारे आणि प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या सहमतीने ज्येष्ठ पत्रकार सिकंदर नदाफ प्रदेश कार्याध्यक्ष भारतीय पत्रकार संघ यांच्यावतीने जाहीर  करण्यात आली.
दिनांक ७ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार संदीपकुमार जाधव यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचे संघटन बळकट करणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्य करणे तसेच संघटनेच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सदर नियुक्ती ७ जून २०२६ पासून ६ जून २०२८ पर्यंत वैध राहणार असून, त्यांच्या कार्यक्षमता व संघटनात्मक कामगिरीच्या आधारे पुढील कालावधीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
संदीपकुमार जाधव यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि समाजहिताच्या पत्रकारितेला अधिक बळकटी देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल संदीपकुमार जाधव यांनी भारतीय पत्रकार संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानून संघटनेच्या नियमांचे पालन करत पत्रकार बांधवांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.