संत गुंडोजीबाबा विद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.

संत गुंडोजीबाबा विद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.


 पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम  

जागतिक पर्यावरण दिन
आज श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर व सामाजिक वनीकरण सातारा वनपरिक्षेत्र वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये 5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण वडूज आर. एस. सातपुते साहेब यांनी विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचे महत्त्व समजून सांगितले. या वेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थी चि.समर्थ सावंत यांचे पालक , माजी विद्यार्थी ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर व उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जि.प.प्राथ.शाळा विसापूर गणेश सावंत यांनी वाढदिवसानिमित्त पाच वृक्षांची रोपे दिली. कुमारी अनुष्का अर्जुन कदम तिच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष रोप देण्यात आले. व अनुष्का कदम व समर्थ सावंत या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .श्री सातपुते साहेब, आवारे साहेब, कुंभार साहेब , वनरक्षक कोळी साहेब , विसापूरचे पोलीस पाटील प्रल्हाद (भाऊ)सावंत, श्री आप्पा, मुख्याध्यापक श्री गायकवाड सर, यांच्या शुभहस्ते वृक्षांची करण्यात आले यावेळी हरित सेना विभाग प्रमुख श्री लावंड सर, विद्यालयातील  शिक्षिका जाधव मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी दादा कांबळे , शशी कुलकर्णी, दीपक शेडगे,विद्यार्थी, ग्रामस्थ विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.