जायगाव ता. खटाव येथील सुपुत्र रवींद्र विश्वनाथ देशमुख विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित.
जायगाव ता. खटाव येथील सुपुत्र रवींद्र विश्वनाथ देशमुख विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित.
औंध प्रतिनिधी, नवनाथ देशमुख.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत महामंडळाकडे कामगार निधी भरणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना साहित्य सामाजिक शैक्षणिक क्रीडा आदी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी महामंडळाकडून विश्वकर्मा गुनवंत कामगार कल्याण पुरस्कार पूर्वीचे नाव गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार व कामगार भूषण पुरस्कार दिला जातो त्याचबरोबर पुढील दहा वर्ष साहित्य सामाजिक शैक्षणिक क्रीडा आदी क्षेत्रात योगदान दिल्याने विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार व कामगार भूषण पुरस्कार सन 2024 अंतर्गत एकूण बावन कामगारांची निवड करण्यात आली असून त्यांना रोख रक्कम पारितोषिक म्हणून रक्कम रुपये 25000 व स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यापैकी श्री रवींद्र विश्वनाथ देशमुख यांची निवड करून त्यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रशस्तीपत्र. स्मृतीपत्र. रक्कम रु.50000 देऊन पुरस्काराने सन्मानित केलेने जायगाव तालुका खटाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्याचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment