खटाव तालुक्यात रंगणार भव्य ‘आमदार केसरी’ बैलगाडी शर्यत;

खटाव तालुक्यात रंगणार भव्य ‘आमदार केसरी’ बैलगाडी शर्यत;

 १० जून रोजी भुरकवडी फाट्यावर थरार!

विशेष प्रतिनिधी,गणेश घाडगे.

स्व. पंढरीनाथ फडके यांच्या स्मरणार्थ खटाव तालुक्यातील भुरकवडी फाटी येथील ओपन मैदानावर भव्य बैलगाडी शर्यत आमदार केसरी’ (पर्व ३ रे)चे जंगी आयोजन करण्यात आले आहे. ही थरारक शर्यत बुधवार, दिनांक १० जून २०२६रोजी पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित बैलगाड्या आणि शौकीन आपले नशीब आजमावणार आहेत.
या भव्य स्पर्धेचे आयोजन विकास (आबा) जाधव मित्र समूह, पुसेगाव आणि १०१० सरकार विगर पनवेल यांच्या वतीने करण्यात आले आहे.आमदार केसरी मैदानाला प्रमुख उपस्थिती ​श्रीमंत १०८ प.पू.सुंदरगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव)​मा. आमदार महेशदादा शिंदे (उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य)​मा.सौ. प्रियाताई महेशजी शिंदे (अध्यक्ष, जि.प. सातारा)श्री.गुरुनाथ शेठ फडके 1010 सरकार,पुसेगाव पोलीस अधिकारी एन.जे.खुणे साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी काका घाडगे उपस्थित राहणार आहेत.लाखांची बक्षिसे आणि आकर्षक ढालींची लुट
या शर्यतीमध्ये पहिल्या ७ क्रमांकांसाठी भव्य रोख बक्षिसे आणि आकर्षक ढाली दिल्या जाणार आहेत. बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
 प्रथम क्रमांक: ₹१,००,०१0/- चे बक्षीस आहे आणि अनुक्रमे सात क्रमांक ला उत्कृष्ट बक्षीस आहेत. अधिक माहिती साठी विकास आबा यांना संपर्क करावा.
या मुख्य बक्षिसांव्यतिरिक्त क्वार्टर फायनल आणि मेगा फायनलमधील विजेत्यांसाठी देखील स्वतंत्र रोख बक्षिसे (₹१०,०१० ते ₹२,०१०) आणि ढाली ठेवण्यात आल्या आहेत. मेगा फायनलमधील सर्व बक्षिसे पिंटू शेठ विकास आईस्क्रीमआणि भरकादेवी आईस्क्रीम यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहेत. तसेच ढाल सौजन्य शिवाजी शेडगे (भाजपा खटाव तालुका अध्यक्ष)यांचे लाभले आहे.
या मैदानात गतवर्षी कारुडेचा ‘चिक्या’आणि संभाजीनगरचा  लखन या बैलजोड्यांनी विजेतेपद पटकावून मैदान गाजवले होते. त्यामुळे यावर्षी देखील कोणता नवा 'किंग' ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रवेश फी ₹१,१00/- मात्र.
 सदर मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पार पडेल.शर्यतीचे थेट प्रक्षेपण PB LIVE YouTubeवर केले जाणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शौकिनांनी या थराराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.