फलटणच्या पोस्ट ऑफिसचा भोंगळ कारभार.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
फलटण तालुक्याच्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये अनेक जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या काही ठराविक रुपयांच्या ठेवी आहेत. ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी हे वयोमानानुसार थकलेले आजारी असतात तरीसुद्धा ते पोस्टामध्ये त्यांच्या मासिक व्याज काढणे.आरडी भरणे यासाठी येतात परंतु पोस्टमध्ये त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही. उद्धटपणे बोलवले जाते. इथेही भरायचं समजत नाही का, कळत नाही का, फॉर्म पुन्हा भरून या, कोणतेही योग्य मार्गदर्शन केले जात नाही. तसेच पासबुक विसरले किंवा पोस्टातच राहिले तर पुन्हा दुसरे पासबुक काढण्यासाठी साठ रुपये फी व महिनाभर त्याची वाट पहावी लागते हा अन्याय जेष्ठ नागरिकांवर आहे.पोस्टामध्ये बसण्यासाठी योग्य सुविधा नाही.पिण्याचे पाणी याची कोणती सोय केली गेलेली नाही. तरी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था व फॉर्म भरताना मदत करण्यात यावी.तसेच त्यांच्याशी सभ्यपणे बोलण्यात यावे. जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणे. हेलपाटे मारायला लावणे ही गंभीर बाबअसून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.अन्यथा जेष्ठ नागरिक संघातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकांना पोस्टाच्या सर्व सोयी सुविधांची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करावे व मदत करावी. पुन्हा पुन्हा हेलपाटे मारायला लावू नयेत. अशी मागणी जेष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात येत आहे. डिजिटल च्या जमान्यात 15 दिवस किंवा महिनाभर डुबलीकेट पासबुक मिळण्यास वेळ लागतो. ते लगेच मिळण्यात यावे. सीनियर सिटीजनच्या तिमाही व्याज ताबडतोब मिळावे. एखाद्याचे पासबुक घरी राहिले असेल हरवले असेल तर त्यांची अडवणूक करण्यात येऊ नये. ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचाराची वेळेवर पैशाची गरज असते. यासाठी पोस्टातील पैसे वेळेवर मिळणे गरजेचे आहे. पोस्टामध्ये कोणतीही ज्येष्ठ नागरिकाचीअडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी मागणी जेष्ठ नागरिक संघ फलटण, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचारी संघ यांनी केली आहे.
Comments
Post a Comment