खासदारांच्या 'त्या' वक्तव्याने पत्रकार वर्गात संताप; डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध, सर्व जिल्ह्यांत आंदोलनाचा इशारा.
खासदारांच्या 'त्या' वक्तव्याने पत्रकार वर्गात संताप; डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध, सर्व जिल्ह्यांत आंदोलनाचा इशारा.
पुसेगाव प्रतिनिधी :अकबर भालदार.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा महाराष्ट्रात नेहमीच सन्मान केला जातो. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला अजिबात शोभणारे नाही, अशा शब्दांत 'अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने' या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. तसेच, पत्रकारांचा अपमान करणाऱ्या संबंधित खासदारावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सर्व जिल्ह्यांत आंदोलन छेडणार
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत आणि राज्य महासचिव विकास भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे संघटनेची भूमिका स्पष्ट केली आहे. खासदारांच्या या वर्तणुकीविरोधात आता संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार एकवटले असून, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी
शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आणि आक्षेपार्ह आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याविषयी तात्काळ आणि कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातील पत्रकार आणि संपादक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Comments
Post a Comment