गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.
एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.
फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फलटण तालुक्यातील गिरवी गावचे सुपुत्र व सध्या फलटण येथे वास्तव्यात असणारे सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक अंतर्गत घेतलेल्या एम.बी.बी.एस फायनल परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे या कॉलेज मध्ये त्यांना 2021 साली M.B.B.S साठी प्रवेश मिळाला होता . व यावर्षी झालेल्या परीक्षेत त्यांनी 1800 गुणांपैकी 1117 उत्कृष्ठ गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सिद्धांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असून ही त्यांनी पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण हे कमला निंबकर बालभवन येथून पुर्ण केले. डॉ. सिद्धांत निकाळजे यांचे वडील श्री राजेंद्र प्रसाद मानसिंग निकाळजे व आई सौ शितल राजेंद्र प्रसाद निकाळजे दोघेही जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत या यशात डॉ सिद्धांत यांना त्यांच्या आई वडिलांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे या यशाबद्दल डॉ.सिद्धांत यांना सामाजिक शैक्षणीक विविध स्तरातील मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment