केंद्रीय लोकशाही पत्रकार संघच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सम्राट गायकवाड यांची नियुक्ती.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
दि.२६ केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी सम्राट गायकवाड यांची निवड करण्यात आली सम्राट गायकवाड हे झी 24 तास सातारा जिल्हा प्रतिनिधी तसेच पुण्यनगरी प्रतिनिधी, व अजिंक्य सह्याद्री या साप्ताहिकाचे संपादक सम्राट गायकवाड यांची निवड केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजु दळवी व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ राष्ट्रीय सचिव गोविंद मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.श्री.सम्राट गायकवाड हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम कित्येक वर्ष करत आले आहेत तसेच शिव- शाहू फुले आंबेडकर व सर्व महापुरुष यांचे विचारांचा वारसा जोपासणारे व अभ्यास व्यक्तिमत्व तसेच निर्भीडपणे आपले मत मांडणारे तसेच लेखणीच्या माध्यमातून जन सामान्य लोकांचा वृत्तपत्राच्या माध्यमातून पोचणारे सम्राट गायकवाड यांची निवड केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment