शहीद जवानांच्या परिवारांच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची ग्वाही.
शहीद जवानांच्या परिवारांच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची ग्वाही.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
सैनिक कल्याण विभागातर्फे आज २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त सातारा येथे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रम पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच कारगिल युद्धात भारतीय सैन्य दलांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल मन:पूर्वक सलाम करत शहीद जवानांच्या स्मृतींना त्यांनी यावेळी अभिवादन केले. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपले जवान छातीचा कोट करून परकीय शक्तीची आक्रमणे परतवून लावत असतात. वर्दीधारी जवान अहोरात्र देशांच्या सीमांचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आपण देशबांधव सुरक्षित राहतो. त्यामुळे आपल्या सैन्य दलांचा आणि सैनिकांचा आदर्श घेऊन त्यांच्याप्रति गौरव आणि सन्मानाची भावना जोपासणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली. तसेच येणाऱ्या १५ ऑगस्टपासून वॉर मेमोरियलला १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी अभिवादन करण्याची प्रथा जिल्ह्यात सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
सैन्यदल, माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन सदैव कटिबद्ध आहे. ज्या शहिदांच्या परिवारांना अद्यापही जागा मिळाली नाही, त्यांच्या जागेचा प्रश्न येत्या २७ ऑगस्ट या शहीद गजानन मोरे यांच्या हौतात्म्य दिनाच्या आधी मार्गी लावू, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच या प्रकरणी मंत्रालय स्तरावर आढावा घेऊ व या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी कारगिल युद्धातील राज्यातील हुतात्म्यांच्या वारसांचा, युद्धात अपंगत्व आलेल्यांचा, तसेच शौर्यपदक प्राप्त अधिकारी व जवानांचा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास सैनिक कल्याण विभागाचे राज्याचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाड, भारतीय सेना दलाचे निवृत्त जनरल विजय पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक (ले.क.निवृत्त) आर. आर. जाधव, कर्नल सतीश हंगे, लेफ्टनंट कर्नल भीमसेन चवदार, मेजर आनंद पाथरकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्यासह जवानांचे कुटुंबीय आणि नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment