विसापूर येथील गुंडोजीबाबा विद्यालयात निर्भया पथकाची मीटिंग उत्साहात.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
विसापूर ता खटाव जिल्हा सातारा येथे
पोलीस उपाधिक्षक कोरेगाव यांच्यावतीने श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर मध्ये निर्भया पथकाच्या मीटिंगचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी या पथकाचे पोलीस नाईक आरती यादव यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.पोलीस नाईक आरती यादव यांनी निर्भया पथकाची गरज सांगितली. निर्भया पथक कोणती कामे करते याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना कोणकोणत्या अडचणी येतात अशावेळी मुलींनी काय करावे याचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उद्बोधनातून अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनांची माहिती सांगितली. मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे याच्या सूचना दिल्या. पोलीस शिपाई राहुल मदने यांनी मुलांनी कोणत्या सवयी पासून दूर राहावे याची माहिती दिली. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा कसा गुन्हा आहे याची माहिती दिली. तुम्हाला जर अडचणी आल्या तर कोणत्या नंबर वर संपर्क साधायचा अथवा कोणाशी संपर्क साधायचा आहे याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी निर्भया पथकातील अन्य सहकारी उपस्थित होते. तसेच गावचे पोलीस पाटील भाऊसो सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुरलीधर साळुंखे ,सौ रत्न फडतरे , माजी उपसरपंच बाळासाहेब सावंत, माजी चेअरमन नवनाथ साळुंखे, रमेश साळुंखे, राजेश साळुंखे ग्रामस्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी विद्यार्थिनी या मिटींगला उपस्थित होते.
Comments
Post a Comment