फलटण येथे छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव उत्साहात संपन्न.
फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने.
छत्रपती शाहू महाराज यांची सालाबाद प्रमाणे शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोळा विविध उपक्रमांनी थाटात साजरा करण्यात आला. मंगळवार पेठेतून छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा सालाबाद प्रमाणे काढण्यातआली.छत्रपती शाहू महाराज जयंती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब तुकाराम जगताप. प्रा. डॉ. प्रभाकर पवार. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर. मुरलीधर सावंत. जयंती समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य प्रदीप जगताप. मुख्याध्यापक बंटी शिंदे बारामती. नंदू गायकवाड. असे अनेक मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. सदर सोहळ्यामध्ये अभिप्रेत असलेल्या पारंपरिक वाहनांचा देखील समावेश होता. त्याचबरोबर मुलींचे लेझीम पथक. सनई सुर. हलगी. संबळ. तुतारी असे अनेक वाद्यांचा समावेश होता. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांची मूळ नाव यशवंत असे होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे. व आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर आनंदीबाई यांनी यशवंतराव यांना दत्तक घेतले. 17 मार्च 1884 रोजी नंतर त्यांचे नाव छत्रपती शाहू महाराज ठेवण्यात आले. 1889 ते 1893 या चार वर्षाचा धारवाड येथे त्यांच्या शैक्षणिक कार्याचा व शारीरिक विकास झाला. दोन एप्रिल 1894 रोजी त्यांचा राजा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 1922 सालापर्यंत म्हणजेच 28 वर्षाचे ते राजे होते शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत ब्रिटिश राज सत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या समितीला न जुमनता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी महत्वाची भूमिका बजावली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हत्ती रथातून पहिली मिरवणूक काढणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. बहुजन समाजाचे उद्धारक छत्रपती शाहू महाराज जयंती सोहळा शिस्तबद पद्धतीने साजरा करण्यात आला. मिरवणूक दरम्यान फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. विशेष म्हणजे मुलींच्या लेझीम पथकाने छत्रपती शाहू महाराज यांच्यावर छान असे गीत सादर केले. जयंती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी जयंतीनिमित्त सर्वांना धन्यवाद देऊन आभार मानले.
Comments
Post a Comment