वडूज येथील अग्निशमन केंद्र इमारत भूमिपूजन समारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न.

वडूज येथील अग्निशमन केंद्र इमारत भूमिपूजन समारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

वडूज तालुका खटाव येथील  नगरपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या अग्नीशमन केंद्र इमारतीचे भूमिपूजन माण-खटाव मतदारसंघाचे लोकप्रिय जलनायक आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या योजनेसाठी इमारत बांधकाम व गाडीसाठी अंदाजे १ कोटी ७२ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. याकामी आ.जयकुमार गोरे व सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. अग्नीशमन केंद्र व अग्निशमन गाडी सुविधेचा हा खटाव तालुक्यातील पहिलाच उपक्रम आहे.या उपक्रमामुळे आगीसारख्या दुर्घटनेत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .यावेळी वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप साहेब,  नगराध्यक्ष सौ.मनीषा रवींद्र काळे , उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर , खटाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब , भरत (आप्पा ) माळी , सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्पशेठ शहा ,आप्पासाहेब गोडसे , भाजपा वडूज शहर अध्यक्ष प्रदीप शेटे , माजी सरपंच अनिल (अण्णा ) गोडसे , संदिप गोडसे, शशीभाऊ पाटोळे , संजय काळे साहेब ,आर बी काळे सर , नगरसेविका रेश्मा बनसोडे,  स्वप्नाली गोडसे , शितल गोडसे,  नगरसेवक सचिनशेठ माळी , माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे , जयवंत पाटील , अमोलशेठ गोडसे, निलेश गोडसे (काका) , अनिल माळी , सोमनाथशेठ जाधव, बनाजी पाटोळे सर , गणेशशेठ गोडसे,ओंकार चव्हाण ,अभयसिंह देशमुख , श्रीकांत काळे , विक्रमशेठ रोमन ,  श्रीकांत (काका ) बनसोडे , निलेश कर्पे , शशीभाऊ काळे , हनमंतराव गोडसे , बापू ननावरे , प्रतिक बडेकर , भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब काळे पाटील सावकार , जितेंद्र गोडसे , राहुल लोहार ,आकाश जाधव , तसेच वडूज नगरीचे माजी नगरसेवक , नगसेविका व   वडूज शहरातील नागरीक , पदाधिकारी व डिजिटल मीडिया व विविध दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.