पुसेगाव परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ पोलिस चोरट्यांच्या मुस्क्या आवळणार का शेतकऱ्यांचा प्रश्न.

पुसेगाव परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ पोलिस चोरट्यांच्या मुस्क्या  आवळणार का शेतकऱ्यांचा प्रश्न.

 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

 शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावणाऱ्या घटनांचा पाढा काही सध्या सुटत नाही. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर ठीक आहे . कारण या घटना शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेल्याच असतात परंतु केबल चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीवर आता आपला ठिय्या केला आहे. लाखो रुपये किमतीच्या केबल तांब्याच्या  विक्रीमोहापाई चोरट्यांनी  लंपास केल्याच्या घटनांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की.. शेतकऱ्यांच्या विहिरीवर मोटर साठी लागणाऱ्या केबल ह्या अतिशय महाग आहेत. त्यामध्ये असणारे तांबे हे विद्युत वाहक असल्याने त्याला बाजारात मोठा भाव मिळतो. एका विहिरीवर तीन हजार ते पाच हजार रुपये किमतीची केबल जोडली जाते. चोरट्यांना याबाबत माहिती असल्याने रात्री आपण रात्री या केबल कनेक्शन कट करीत पसार केल्या जातात. याबाबत येथील शेतकरी लक्ष्मणराव जाधव, उमेश मखरे ,रामचंद्र माने, शंकर वसंत जाधव, यशवंत चव्हाण, मनोज जाधव इत्यादी सह अनेक जणांच्या विहिरीवरील केबल चोरीला गेल्या आहेत. पुसेगाव पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदवून घेण्यासाठी सांगितले असता याबाबत कानावर हात ठेवीत पोलीस यंत्रणा एक प्रकारे मूग गिळून गप्प बसल्याचे बोलले जात आहे. पोलीस यंत्रणा आमच्याकडे नक्की काय करावे आणि कुठे कुठे शोधावे या संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे तुम्हीच आम्हाला संशयित व्यक्तींची नावे सांगा मग आम्ही कारवाई करतो अशी उत्तरे दिली जात आहेत. सध्या पुसेगाव परिसरात फाळकोट दादांचे पेव फुटल्याने अशा चोरट्यांना असे हुल्लड बाज लोक पाठीशी घालून आपली पो ळी भाजून घेण्याचे काम करत आहेत. गेले आठवडाभर केबल चोरीची दररोज घटना घडत असताना याबाबत पोलिस यंत्रणे कडून कसलाही तपास केला जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये सतत आले चोरीच्या, केबल चोरीच्या, मोटर चोरीच्या, डीपी तोडल्याच्या, कांदा ऐरणी फोडल्याच्या आणि अगदी सोयाबीन चोरल्याच्या घटना अनेक घडलेल्या आहेत. मात्र याबाबत कोणत्यातरी चोरट्याला पकडल्याची बाब पुढे आल्याचे दिसत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नक्की न्याय देणारे कोणी आहे का नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. वास्तविक पाहता शेतकरी नेते आता राज्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून महा भागांच्या कळपात घुसल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे लक्ष्मणराव जाधव यांनी सांगितले. नेर तलाव परिसरात व डोंगर बारीच्या बाजूने असलेल्या विहिरी मधून केबल चोरीचे प्रमाण मोठे असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी याबाबत किमान रात्रीचे पेट्रोलिंग करीत अशा घटनांचा छडा लावण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. अन्यथा ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा आयोजित करून या प्रश्नांच्या बाबत पोलिसांना जाब विचारणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बाबत घडत असलेल्या घटनांच्या वर गांभीर्याने विचार करून आम्ही पोलीस यंत्रणेला प्रसंगी वेठीस धरणार असल्याचे येथील माजी उपसरपंच रणधीर शेठ जाधव यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.