नवीन कायद्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणे मार्फत पोलीस पाटलांना मार्गदर्शन.

नवीन कायद्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणे मार्फत पोलीस पाटलांना मार्गदर्शन.


पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पोलीस पाटील यांना आज दिनांक 2.7.24 रोजी सकाळी 11.00 वा .ता पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील व नागरिक यांचेसाठी नवीन कायदे बाबत प्रशिक्षण पुसेगाव पोलीस ठाणे येथे सहा.पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे यांनी आयोजित केले होते. उपस्थितांना स पो नि आशिष कांबळे यांनी 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेल्या 1.भारतीय न्याय संहिता 2023, 2.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, 3.भारतीय साक्ष अधिनियम 2023 यातील प्रमुख तरतुदींचे मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी निर्माण केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचे अनुषंगाने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या माहितीबाबत सॉफ्ट कॉपी पोलीस पाटील यांना देण्यात आल्या आहेत. चर्चासत्राची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली आहे. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील      सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज, सामाजिक व्यासपीठे येथेही आगामी कालावधीत नवीन कायदे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करणार असल्याची माहिती स पो नि आशिष कांबळे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.