रामेश्वर डोंगर बहरला विविध फुलांनी , फळांनी ,रंगीबेरंगी पानांनी.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
विसापूर तालुका खटाव येथील रामेश्वर डोंगरावरील ऐतिहासिक रामेश्वर मंदिरा शेजारील बेचिराग असणारी रामेश्वरवाडी येथील श्रीरामांच्या पवित्र पावन स्पर्शाने पवित्र झालेला रामेश्वर डोंगर मध्ये विविध झाडांची फुले व फळे नवनवीन झाडाला लागलेली पालवी पाहून रामेश्वर डोंगर हा निसर्गरम्य रम्याने नाहून निघाला असून हे पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील अभ्यासू लोक रामेश्वर डोंगर मध्ये येत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये पळस ,करवंद, वाघाटी, मेडसिंग ,कुशांबी, धायटी ,पैर, सोनसाखळी , ग्लेरेसिडिया यासारखे असंख्य विविध झाडे पाहून मनमोहक दृश्य दिसत असून बरेसे हौशी निसर्ग प्रेमी फोटो काढण्यासाठी व शूटिंग करण्यासाठी या डोंगर भागात फिरताना दिसत आहेत यावर्षी करवंद या फळाच्या जाळ्या फुलांनी भरले असून उन्हाळ्यामध्ये डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी चांगलीच खायला मिळणार असल्याचे डोंगरात फिरताना दिसून येते.
Comments
Post a Comment