चिमुकल्यांच्या कलाविष्काराने विसापूरकर मंत्रमुग्धतब्बल ७९ हजारांचे बक्षीस.
तब्बल ७९ हजारांचे बक्षीस.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
विसापूर ता. खटाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या 'अंकुर-२०२४' वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याविष्काराने विसापूरकर मंत्रमुग्ध झाले. अतिशय नेटके नियोजन असलेला विसापूर येथील शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात आकर्षण ठरतो. गेली दशकभर सुरू असलेला कार्यक्रम वर्षानुवर्षे बहरत असून येथील बालकलाकार अतिशय सुंदर कार्यक्रम सादर करतात. गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेकविध उपक्रम शाळेत राबविले जातात. जिल्हा परिषदेच्या अनेक उपक्रमात विसापूर शाळा अग्रभागी असते. सातत्यपूर्ण विविधांगी उपक्रम राबवित या शाळेने जिल्हास्तरावर यश मिळविले आहे. निस्पृह भावनेने कार्य करणाऱ्या ग्रामस्थ व पालकांची शाळेप्रति असलेली एकजूट ही शाळा विकासात महत्वाची ठरते. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी तब्बल ६४ हजार रोख आणि वस्तुरूपाने १५ हजार असा एकूण ७९ हजार शैक्षणिक उठाव लोकांनी दिला. शाळेच्या प्रशस्त इमारतीसाठी पाठपुरावा सुरू असून भविष्यात अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे यांनी व्यक्त केले. मधुकर साळुंखे यांनी सर्व उपक्रमांचे कौतुक करत १ली ते ५वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षात 'मारुती मास्तर शिष्यवृत्ती' जाहीर केली आहे.शाळेच्या वतीने माता पालकांसाठी आयोजित होम-मिनिस्टर स्पर्धेत विजेत्या सौ.सुमंगल हिरकुर यांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे आणि छाया जगदाळे या दाम्पत्याचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच निलम जगताप, उपसरपंच प्रियांका साळुंखे, युवा नेते हरिश्चंद्र सावंत, ग्रा. प. सदस्य सुनिता मोहिते, विठ्ठल साळुंखे,कैलास साळुंखे, राजेश ढोले, मुरलीधर साळुंखे सोसायटीचे चेअरमन सयाजी सावंत, पोलीस पाटील प्रल्हाद सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनी साळुंखे, उपाध्यक्ष अनुजा ढोले, विलास सावंत, हनुमंत सावंत, विजय साळुंखे, शिवाजी सावंत, संजय शिंदे, लक्ष्मण सावंत हायस्कूलचे मुख्याध्यापक महेंद्र गायकवाड, ह. भ. प. प्रियांका कदम आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षिका वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे यांनी परिश्रम घेतले. मोहसिन शेख यांनी नृत्यदिग्दर्शन केले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर धायगुडे यांनी प्रास्ताविक, दत्तात्रय सावंत यांनी सूत्रसंचालन तर आनंदराव साळुंखे यांनी आभार मानले.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकविणाऱ्या आर्या ढोले, अदिती काटे, अथर्व घाडगे या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने निरंतर ठेव योजनेतून प्रत्येकी ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा तालुक्यात अनोखा प्रयोग येथे सुरू आहे. या योजनेतून आतापर्यंत ८ विद्यार्थ्यांना बक्षीस दिले आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेतील विजेते विघ्नेश गुजर, कल्याणी साळुंखे, अर्पिता काटे, अनन्या साळुंखे या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment