ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे वनक्षेत्रात लागलेली आग विझवण्यात वर्धनगड ग्रामस्थांना व वन विभागाला यश.

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे वनक्षेत्रात लागलेली आग विझवण्यात वर्धनगड ग्रामस्थांना व वन विभागाला यश.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

रविवार दिनांक 24/03/2024 रोजी पुसेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धनगड ता. खटाव जिल्हा सातारा,गावातील फॉरेस्टला रात्री 2 वाजता आग लागलेली आहे,हे लक्षात येतात सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावचे पोलीस पाटील श्री गणेश जठार यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली काही तरुण या यंत्रणेने जागे झाले. ग्रामपंचायत कर्मचारी चांगदेव जाधव यांनी मंदिराच्या ध्वनि क्षेपकावरून वारंवार अलाउन्स केले. यावेळी येथील माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कुंभार, सादिक शिकलगार, आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण मदतीसाठी धावले व त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी तांबोळी व त्यांचे सहकारी अर्ध्या तासाच्या आत वर्धनगड येथे पोहोच झाले  *फॉरेस्टला लागलेली आग ग्रामस्थांच्या व वन विभागाच्या मदतीने दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर विझवण्यात आली.  ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे मोठा अनर्थ टळला* परंतु या डोंगरावरती या आठवढयामध्ये दोन वेळा आग लागली आहे. ही आग लागत आहे की, लावली जात आहे. हा संशोधनाचा विषय असून, यावर वन विभागाने पाळत ठेवण्याची गरज आहे. सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, या वनव्यामुळे वन धोक्यात येत आहेत, तसेच या डोंगर जंगलामध्ये वन्य प्राण्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. डोंगराच्या पायथ्यालगत  तलाव असल्यामुळे हे प्राणी या तलावावर पाणी पिण्यासाठी येत असतात, अशा लावलेल्या वनव्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. सदर याबाबत वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची चर्चा आता ग्रामस्थांमध्ये बोलली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.