सामाजिक बांधिलकी जपणारे वारकरी ह .भ .प .रघुनाथ उर्फ सर्जेराव (बुवा ) घोरपडे यांचं प्रथम स्मृतिदिन.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
वर्धनगड ( ता. खटाव ) येथील वारकरी भूषण हरिभक्त परायण सर्जेराव बुवा घोरपडे यांचा आज दिनांक 11. 4 .2024 ( सोमवारी) प्रथम स्मृतिदिन त्यानिमित्ताने
अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले सर्जेराव उर्फ रघुनाथ श्री घोरपडे बुवा यांचा जीवन प्रवास अत्यंत थक्क करणारा असा आहे कधीही पैशाला महत्त्व न देता त्यांनी माणूस जोडण्याचे काम आयुष्यभर केले लहानपणीच वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले त्यानंतर त्यांची आई अनुसया दत्तात्रेय घोरपडे यांनी अतिशय संस्कारक्षम वातावरणामध्ये त्यांचे पालन पोषण केले तरुण वयात त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शेतीमध्ये नवनवीन कल्पना राबवून आधुनिक पद्धतीने शेती केली आणि शेती करत त्यांनी आपल्या एक मुलगी व दोन मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आज त्यांची दोन्ही मुले शेती व उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट असे काम करत आहेत तसेच त्यांचा वारसा प्रभावीपणे चालवत आहेत सर्जेराव बुवा यांनी आपल्या 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये पांडुरंगाची मनोभावी सेवा केली त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत कीर्तनामध्ये विना घेण्याचे काम केले आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी माणसांमध्ये देव पाहिला आणि म्हणूनच त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करण्याचे काम आयुष्याच्या शेवटपर्यंत केले. अंगणी वसंत फुलला. उरली नाही साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला तुम्ही फिरूनी यावे पुन्हा जन्माला. त्यानी वर्धनगड मधील 120 लोकांचे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून पुण्याच्या बुधरानी हॉस्पिटलमध्ये विना मोबदला मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया केली तसेच अनेक लोकांना एसटी महामंडळाचे पासेस देखील मिळवून दिले तसेच गावातील छोटी-मोठी कामे असोत सर्जेराव बुवा नेहमी अग्रेसर असायचे ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले वर्धनी माता ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले तसेच त्यांचे सद्गुरु शंकर महाराज रसाळ यांच्या आशीर्वादाने त्यांनी आपला मृत्यू 21 दिवस अगोदर सांगितला कलियुगामध्ये अशक्य असणारी गोष्ट त्यांनी आपल्या गुरूंच्या आशीर्वादामुळे शक्य करून दाखवली आज आपला मृत्यू कधी होईल हे कोणीही सांगू शकत नाही परंतु त्यांनी तो 21 दिवस अगोदर सांगितला अशी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सद्गुरूंच्या कृपेने त्यांनी आपलं आयुष्य पैल तिरी पार लावले आज त्यांच्या विचारांचा वारसा त्यांची दोन्ही मुले समर्थपणे चालवत आहेत आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उच्च कोटीचे कार्य करणारे सर्जेराव उर्फ रघुनाथ दत्तात्रय घोरपडे बुवा यांचा आज प्रथम पुण्यदिन यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन
Comments
Post a Comment