पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावयानेच लावली फोटो स्टुडिओला आग.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
डिस्कळ. ता .खटाव येथे पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावयाने चिडून चार सहकाऱ्यांच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या रात्री डिस्कळ येथील अशोक विठ्ठल यादव यांच्या फोटो स्टुडिओला आग लावली व हे गैरकृत्य केले आणि पलायन केले होते. त्या सर्व आरोपीस पुसेगाव पोलिसांनी जेरबंद केले.
पुसेगाव पोलीस स्टेशन वरून मिळाली माहिती अशी दि. 8/3/2024 रोजी महाशिवरात्रीच्या रात्री पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील डिस्कळ तालुका खटाव येथील पंचरत्न कॉम्प्लेक्स मधील आग लावून पळून गेले बाबत पुसेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. सदर अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पुसेगाव पोलिसांसमोर होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चौकशी सुरू केली असता, महाशिवरात्रीच्या रात्री बुध गावातील एका पुलावर चार चाकी गाडीचा अपघात होऊन ती भरदा वेगाने निघून गेल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून तपास केला असता, हुंडाई कंपनीची ईवान कार मधून चार इसमांनी येऊन सदरचा गुन्हा केल्याचे लक्षात आले. सदर पोलिसांनी तत्काळ गाडीची माहिती प्राप्त करून गाडी मालकाचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी करून इतर तीन आरोपींना पोलीस ठाण्यात आणले व त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीच फोटो स्टुडिओ आग लावण्याचे तपासात निष्पन्न झाले.सदरचा गुन्हा हा फोटो स्टुडिओ चे मालक अशोक विठ्ठल यादव वय 51 वर्ष राहणार मोळ तालुका खटाव जिल्हा सातारा यांचे जावई पृथ्वीराज प्रदीप गायकवाड वय 24 वर्ष राहणार कार्वे तालुका कराड जिल्हा सातारा व त्याचे सहकारी योगेश संजय भोसले वय 24 वर्षे राहणार उरण इस्लामपूर तालुका वाळवा, आकाश प्रभाकर शेळके वय 24 वर्षे राहणार कार्वे, गौरव दिलीप थोरात वय 20 वर्षे राहणार कार्वे यांनी फोटो स्टुडिओला आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फोटो स्टुडिओ चे मालक यांची मुलगी ही घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावई याने असे गैरकृत्य केल्याचे समोर आले. त्यांना दिनांक 12 3 24 रोजी पासून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सोनाली कदम कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी आशिष कांबळे,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनील अबदागिरी, अशोक सरक, प्रमोद कदम, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment