मतदार संघात पक्क्या रस्त्यांचे जाळे बनवणार आ. महेश शिंदे.बुध निढळ पेडगाव वडूज रस्त्याचे भूमिपूजन.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
कोरेगाव खटाव मतदार संघात पक्या रस्त्याचे जाळे बनवणार आहे .मतदार संघात अनेक विकासकामे सुरू आहेत .जिहे कटापूर योजनेचे पाणी नेर तलावातून प्रत्येक गावात पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त आपल्या सहकार्य ची अपेक्षा आहे .निढळ कातळगेवाडी या गावाला नेर तलाव्यातुन पाणी मिळणार आहे.काम प्रगती पथावर आहे.असे प्रतिपादन कोरेगाव खटाव मतदार संघाचे व कृष्णा खोरे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी निढळ येथे केले .बुध निढळ पेडगाव रस्त्यांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते निढळ येथे झाले.निढळ अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले .या कामासाठी 5 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.यामुळे येथील जनतेला या रस्त्याचा फायदा होणार आहे .रस्ते चांगले असले की त्या भागांचा विकास होतो. त्यामुळे आमचे लक्ष जनतेला चांगले पक्के रस्ते देण्याचे आहे आमच्या विकासकामात जनतेचे सहकार्य आम्हाला मिळत आहे असे पुढे ते म्हणाले. यावेळी जी .डी. फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन खुस्पे ,निढळ कातळगेवाडी चे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य, ग्रामस्थ ,उपस्थिती होते .नंदकुमार,देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ताया खुस्पे यांनी आभार मानले यावेळी कृषी बाजार समितीचे खटाव सभापती अण्णा वलेकर ,युवा नेते नवनाथ वलेकर, साहेबराव पाटील ,भीमराव पाटिल ,नवनाथ खुस्पे अशोक घाडगे संजय भोंडवे ,अरुण जाधव, सुनील शिंदे, विजय शिंदे,दिलीप जाधव व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
Comments
Post a Comment