दु:ख दूर करणारे सेवादूत समाजाचे खरे नायक:डॉ.श्रीपाल सबनीस.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
पुणेः-वेदनेला जात-धर्म नसतो. त्यामुळे वेदनेला हात देऊन दु:खाशी एकरूप होणे आवश्यक असते. दु:खाची जाणीव ठेवून कार्य करणारे सेवादूत हे समाजाचे खरे नायक आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
रक्तदान सारख्या अलौकिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच हजारो रुग्णांना मोफत रक्ताची बॅग दिल्याबद्दल आप्पा साहेब घोरपडे यांना हा पुरस्कार देण्यात आला आप्पासाहेब घोरपडे यांना याआधी राष्ट्रीय लेव्हलला ,राज्य लेवलला तसेच अनेक सामाजिक संस्था मधून सन्मानित करण्यात आलेले आहे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी यावेळी यंदाचा दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार सन्मानीत नॅशनल ॲवॉर्ड विजेते रक्तदाते पांडुरंग (अप्पा) घोरपडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, शाल, दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, संस्कृतीचा पराभव व्हावा असे अनेक प्रश्न समाजात आहेत, हे आपले दुर्दैव आहे. पण या प्रश्नांची जाणीव ठेवून वैयक्तिक जीवनापेक्षा समाज जीवनाला प्राधान्य देणारे सेवादूत आपल्या सुधारकांचा वारसा पुढे नेत आहेत. समाजाला पुढे नेण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या पुढाकार्यांची गरज नसून अशा सेवाव्रतींची गरज आहे. यावेळी पुरस्कारार्थी नितीन शिंदे आणि गुंजनताई गोळे, पांडुरंग (अप्पा) घोरपडे आणि उमेश महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दादा कोंडके मेमोरिअल फौंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता क्षेमकल्याणी यांनी केले.
दादा कोंडके मेमोरिअल फौंडेशनतर्फे दादा कोंडके यांच्या २६व्या स्मृतीदिनानिमित्त आज दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उमेश महाडिक, पांडुरंग घोरपडे, गुंजन गोळे, नितीन शिंदे, डॉ.श्रीपाल सबनीस, मनोहर कोलते, डॉ. राजेंद्र भवाळकर आणि विक्रम जाधव.
Comments
Post a Comment