आंदरुडमध्ये कृषीदुतांन मार्फत लंपी रोगाचे लसीकरण शिबिर.

आंदरुडमध्ये कृषीदुतांन मार्फत लंपी रोगाचे लसीकरण शिबिर.

फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने. 

फलटण तालुक्यातील आंदरुड येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषि महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतांनी कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत  फलटण तालुक्यातील वाढता लंपीचा प्रादुर्भाव लक्षात घेता आंदरुडमध्ये लंपी रोगाचे निदान करण्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी पशुचिकित्सक डॉ. रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पाडण्यात आले होते . यावेळी आंदरुड गावचे सरपंच संपत कर्णे ,उपसरपंच भागवतराव पाटिल, फलटण मार्केट कमिटीचे अध्यक्ष शंभूराज पाटिल उपस्थित होते. तसेच धनाजी राऊत, जोतिराम वाघ, दिलीप आढाव, शेंडे मिस्त्री, जोतिराम कर्णे, बेलदार सर अशोक राऊत व इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी
चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. डी. निंबाळकर सर ,कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे , प्रा. डॉ. गणेश अडसूळ व प्रा. नितिषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली  कृषीदुत प्रशांत खोकले, अभिजीत भानवसे, समाधान चव्हाण, सुजित कन्हेरे, सुशांत खांडेकर, शंकर शिंदे आणि गणेश साबळे या कृषीदुतांनी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.