श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्या धुळदेव येथे दाखल.

श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्या धुळदेव येथे दाखल.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. 

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी धुळदेव ता. फलटण जि. सातारा येथे दाखल झाल्या असून धुळदेव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , ग्रामसदस्य व ग्रामस्थांनी या उद्यानकन्या विद्यार्थिनिंचे उत्स्फूर्त स्वागत केले.ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे 20 आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेल्या ह्या विद्यार्थीनी शेतकऱ्यांकडून शेती विषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती प्राप्त करून गावांमध्ये शेतीविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविद्या कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत. दातार रिषिता ,देवकाते मृणाल, देवकर कोमल, कापसे गौरी, कर्चे योगिता, पवार प्रची ह्या उद्यानकन्या येथे दाखल झाल्या आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मा. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले. या उपक्रमासाठी मा. प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर सर , कार्यक्रम अधिकारी  मा.प्रा. अमितकुमार पाटील सर व मा.प्रा. जयेश लेंभे पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.