सातारा-पंढरपूर निकृष्ठ रस्त्याची चौकशी करण्यासाठी वेळ द्या प्रशसनाच्या विनंतीनंतर, रमेश उबाळे यांचे आत्मदहन आंदोलन स्थगित.

सातारा-पंढरपूर निकृष्ठ रस्त्याची चौकशी करण्यासाठी वेळ द्या  प्रशसनाच्या  विनंतीनंतर, रमेश उबाळे यांचे आत्मदहन  आंदोलन स्थगित. 

कोरेगाव/प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. 

सातारा-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला  कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप करून जिल्हा राष्ट्रवादी सामजिक न्याय विभागाचे  अध्यक्ष रमेश उबाळे यांनी दि.१५  ऑगस्ट २०२३ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता परंतु  सदर  कामाची चौकशी करण्यासाठी वेळ द्या अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात  आल्याने रमेश उबाळे यांनी या चौकशीसाठी चाळीस दिवसाचा अवधी देऊन आत्मदहन आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले,  काही दिवसांपूर्वी सातारा- पंढरपूर रस्त्यासाठी  १०० टक्के निधी खर्ची न पडल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. असे निवेदन जिळधिकाऱ्यांना दिले होते. दिलेल्या निवेदनात म्हटले  होते,  
सातारा-पंढरपूर रस्त्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारासाठी प्रशासनाकडून खतपाणी घातली जात आहे. असा आरोप त्यांनी केला होता आणि यामध्ये शासकीय अधिकारी, अभियंता व ठेकेदार या तिघांची मिलीभगत आहे का?आसा प्रश्नही त्यांनी केला आहे. एकंदरीत आम्हाला न्याय मिळणार नाही असेच दिसत असून चालू असलेले काम एम.एस.आर.डी.सी. चे अभियंता व ठेकेदार यांनी दखल घेतली नाही. वारंवार आम्ही या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आवाज उठवत असून आम्हाला आपल्याकडुन न्याय मिळाला नाही म्हणुन थेट दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी  आम्ही आत्मदहन करत आहोत. यात माझे काही बरेवाईट झाल्यास आपण सर्व अधिकारी जबाबदार रहाल असेही उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. दरम्यान रमेश उबाळे यांना प्रशसनाकडून  सदर कामांची चौकशी करण्यासाठी वेळ द्या आम्ही चौकशी करून कारवाई करतो १५ ऑगस्ट २०२३ रोजीचे आंदोलन मागे घ्या अशी विनंती करण्यात आल्याने रमेश उबाळे यांनी चाळीस दिवसांचा चौकशीसाठी अवधी देऊन  आत्मदहन आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे.
२५ सप्टेंबर २०२३ रोजी पुन्हा आंदोलन करणार 
 दरम्यान याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणले, प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आपण हे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करत असलो तरी पुन्हा चाळीस दिवसानंतर २५ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार आहे.. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.