कोरेगाव तालुक्यातील शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यातील पाच जण सातारा जिल्ह्यातून तडीपार.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शरीराविरुद्धचे सातत्याने गुन्हे करणारी टोळी प्रमुख अथर्व अजय पवार वय 19, तैफिक शब्बीर शेख वय 20, मिरज तानाजी बोडरे उर्फ फक्की वय 19, व टोळी सदस्य यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये गर्दी ,मारामारी, करून दुखापात करणे व कोयत्यासारखे घातक शस्त्र बाळगून दुखापत करणे अनुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल असल्याने कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर . बिराजदार यांनी सदर टोळी तसेच कोरेगाव तालुक्यातील परिसरातील शरीराविरुद्धचे सातत्याने गुन्हे करणारे युवराज भरत जगदाळे वय 22 ,टोळीप्रमुख .अथर्व सुशांत जगदाळे वय 21 टोळी सदस्य ,यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये रस्ता अडवून, दुखापत करणे ,मारहाण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे ,गर्दी ,मारामारी करून अनुचित जाती व जमाती यांच्यावर प्रतिबंधक कायद्यांतर्गत येणाऱ्या जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हे दाखल असल्याने कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक एस .आर . बिराजदार यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातील तडीपार करण्याबाबत प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता या टोळीतील इसमांना दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक व कायदेशीर कारवाई करून ते जामिनावर बाहेर असल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईमध्ये कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृतीमध्ये सुधारणा झाली नसून त्यांनी सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना मारहाण करून गुन्हे करीत होते तसेच त्यांच्यावर कायद्याचा कोणता धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती वरील दोन्ही टोळ्यांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हद्दी पार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्यासमोर सुनावणी घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वेय सातारा जिल्ह्यामधून दोन वर्षाकरिता हद्दपारचा आदेश पारित केला आहे नोव्हेंबर 2022 पासून नव उपद्रवी टोळ्यांमधील 24 इसमांना तडीपार करण्यात आले आहे भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दी पार मोक्का एमपीडीएफ अशा प्रकारच्या कारवाई करण्यात येणार आहेत सदर या कारवाई मध्ये सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री बापू बांगर. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो.ना प्रमोद सावंत, केतन शिंदे ,अनुराधा सनस यांनी योग्य पुरावे सादर केले आहेत.
Comments
Post a Comment