खंडाळा-शिरोळ राज्यमार्गाच्या कोरेगाव ते जळगाव दरम्यानच्या रस्ता रुंदीकरण, सुशोभिकरण व डांबरीकरणाचा गुरुवारी शुभारंभ.

खंडाळा-शिरोळ राज्यमार्गाच्या कोरेगाव ते जळगाव दरम्यानच्या रस्ता रुंदीकरण, सुशोभिकरण व डांबरीकरणाचा गुरुवारी शुभारंभ.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. 

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्वाकांक्षी व सर्वसामान्य शेतकरी व ऊस वाहतुकदारांसाठी अत्यंत महत्वाच्या खंडाळा-शिरोळ राज्यमार्गाच्या कोरेगाव ते जळगाव दरम्यानच्या ६ कोटी रुपयांच्या रस्ता रुंदीकरण, सुशोभिकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. 
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, स्थानिक नगरसेवक राजेंद्र वैराट, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे यांच्यासह शिवसेना-भाजप आणि विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सातारा जकात नाका येथे होणार आहे. 
कोरेगाव तालुक्याबरोबरच विधानसभा मतदारसंघाच्यादृष्टीने हा राज्यमार्ग अत्यंत महत्वपूर्ण असून, सातार्‍यासह लगतच्या पुणे आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारीसाठी हा रस्ता अत्यंत महत्वपूर्ण आहे. अंबवडे संमत वाघोली, पळशी, सातारारोड, कोरेगाव, शिरंबे, रहिमतपूरसह तारगावपर्यंत या राज्यमार्गाची लांबी कोरेगाव तालुक्यातून जाते. अहोरात्र या राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या राज्यमार्गाच्या रुंदीकरण, सुशोभिकरण आणि डांबरीकरणाचा निर्णय आमदार महेश शिंदे यांनी घेतला होता. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनाला प्रस्ताव सादर केला होता. आता या रस्त्याचे रस्ता चौपदरीकरण होत असून, वाहनधारकांना त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी या रस्त्याला कामाला तात्काळ मान्यता दिली असून, अर्थसंकल्पामध्ये कोरेगाव शहर ते जळगाव दरम्यानच्या रस्ता रुंदीकरण, सुशोभिकरण आणि डांबरीकरणासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करुन सर्वसामान्य शेतकरी, ग्रामस्थ व वाहनधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असून, काम दर्जेदार होण्यासाठी आमदार महेश शिंदे हे विशेष लक्ष देत आहेत, अशी माहिती प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.