रविवारी मोराळेत सर्वधर्मीय वधुवर पालक परिचय मेळावा.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सात जन्माच्या गाठी विवाह संस्था तासगाव-कवठेमहांकाळ यांच्या वतीने रविवार दिनांक २७ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार यावेळेत दोस्ती मल्टीपर्पज हाॅल मोराळे (ता पलूस) येथे सर्वधर्मीय वधुवर पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती सागर पाटील (वायफळेकर) यांनी कवठेमहांकाळ येथे दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की या सर्वधर्मीय वधुवर पालक परिचय मेळाव्यात प्रथम,घटस्फोटित,विधुर,विधवा तसेच जेष्ठ विवाह इच्छुक मुलामुलींचा व त्यांच्या पालकांचा परिचय करून दिला जाणार आहे.सदर महामेळाव्याचे उदघाटन हे विट्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कवठेकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.तरी याचा विवाहइच्छुकांनी सदर मेळाव्यास वेळेत उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी ९५११६२७१६० अथवा ९५१८९४७२९३ या भ्रमणध्वनीवर नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment