कराड शहरांमध्ये वाहतूकचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार.सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले.

कराड शहरांमध्ये वाहतूकचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार.सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले. 

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम

 कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विद्यानगर कॉलेज परिसरात   वाहतूक शाखेने अचानक विशेष मोहीम राबवली  दरम्यान प्रामुख्याने ट्रिपल सीट, लायसन्स जवळ न बाळगणे, फॅन्सी नंबर प्लेट ,गाडी चालवताना मोबाईल वरून बोलणे , रैश ड्रायव्हिंग व सीट बेल्ट न लावणे व इतर वाहतूक नियम भंग करणे बाबत एकूण 79  केसेस करण्यात आल्या व त्यांच्याकडून तडजोड 70 हजार रुपये शुल्क वसूल करण्यात आला आहे तसेच पाच फॅन्सी नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री चेतन मछले यांनी दिली तर या कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव, तसेच सह फौजदार राजेंद्र घाडगे, पोलीस हवलदार संतोष पाटणकर, प्रशांत शेवाळे ,मनोज शिंदे ,विक्रम हसबे ,अश्विनी सूर्यवंशी मॅडम ,जयसिंग काटे ,सागर चव्हाण ,प्रशांत मोहिते, प्रकाश झिमुर ,शशिकांत घाडगे ,वर्षा भोसले ,पूजा पाटील व चालक विष्णू मर्ढेकर या अधिकारी व अंमलदारांनी भाग घेतला तसेच आगामी असणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने कराड शहरांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये यापुढेही अशा प्रकारच्या अचानक मोहीम राबवून मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक नियंत्रक शाखाचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले आहे .सदर मोहिमेमध्ये करण्यात आलेल्या कारवाई मध्ये भाग घेतलेले अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा , अप्पर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर, डीवायएसपी अमोल ठाकूर ,पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तर कारवाई मध्ये घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.