आंदरूड येथे कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदुतांचे आगमन.
*फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण तालुक्यातील आंदरूड येथे महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहूरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतरगत कृषि महाविद्यालय फलटण येथील कृषिदुतांचे आगमन झाले असुन आंदरुड गावातील ग्रामस्थ व शेतकरी बांधवानी कृषीदुतांचे स्वागत केले. महाविद्यालयातील ग्रामीण । कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत. कृषीदुत प्रशांत खोकले, अभिजीत भानवसे, समाधान चव्हाण, सुजित कन्हेरे, सुशांत खांडेकर, शंकर शिंदे, गणेश साबळे सर्व आंदरुड गावामध्ये राहुन विविध शेती विषयक प्रात्यक्षिक व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी कृषी दुतांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना व शेतकरी बांधवांना उपक्रमाचा उद्देश व रुपरेषा समजावून सांगीतली. यावेळी आंदरुड गावचे सरपंचांनी गावची थोडक्यात माहिती दिली व कृषिदुतांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
या कार्यक्रमास गावचे विद्यमान सरपंच संपत कर्णे उपसरपंच भागवतराव पाटिल फलटण मार्केट कमिटीचे अध्यक्ष शंभूराज पाटिल उपस्थित होते तसेच धनाजी राऊत, जोतिराम वाघ, दिलीप आढाव, शेंडे मिस्त्री, जोतिराम कर्णे, बेलदार सर अशोक राऊत व इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालया चे प्राचार्य डॉ एस. डी. निंबाळकर सर कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे , प्रा. डॉ. गणेश अडसूळ व. प्रा. नितिषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे कृषीदुत घेऊन आंदरूड येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेऊन ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे कृषिदुत शेतक-यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत.
Comments
Post a Comment