ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता विमान सेवा क्षेत्रात रोजगार नोकरीची संधी चेअरमन चंद्रकांत दळवी.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठात बी.बी.ए.एव्हिएशन मॅनेजमेंट हा नविन अभ्यासक्रम सुरु करण्यास विद्या परिषद व नियामक मंडळाने मान्यता दिलेली असुन शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ पासुन हा अभ्यासक्रम सुरु होत आहे.विमान सेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे विमान चालन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.या संधीचा फायदा ग्रामीण भागातील युवक - युवतींना झाला पाहीजे. अशी भुमिका विद्यापीठाचे कुलाधिकारी / चेअरमन श्री.चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली होती.त्यानुसार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.दिगंबर शिर्के यांच्या मार्गदर्शनानुसार हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे.विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळानी हा अभ्यासक्रम सुरु करण्याची विहित प्रक्रिया पुर्ण करुन चालु शैक्षणिक वर्षांपासूनच हा अभ्यासक्रम चालु करण्याची मान्यता दिलेली आहे. एव्हिएशन क्षेत्रात फ्लाईट अटेंडंट, केबिन क्रयु, एअर होस्टेस, एअरपोर्ट मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, फुड अँण्ड बेवरेजमॅनेजमेंट, एअरपोर्ट फायनान्स, एअर इन्श्युरन्स, एअर कार्गो मॅनेजमेंट, एअरपोर्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट,एअरपोर्ट स्क्रिनिंग ऑफीसर्स, मार्केटींग सर्विसेस, रिझर्वेशन अँण्ड पॅसेंजर सर्विसेस, इत्यादी प्रकारच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.तथापि पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचे शिक्षण व प्रशिक्षण देणा-या संस्था नसल्याने परिसरातील युवक - युवतींना या क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध होवु शकत नव्हत्या.या बाबीचा विचार करून विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरु केलेला आहे.या अभ्यासक्रमासाठी एव्हिएशन मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापकांची नेमणुक केली जाणार असुन एव्हिएशन क्षेत्रात कार्यरत असणा-या विविध प्रकारच्या संस्था व कंपन्यांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे.तसेच या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि ऑन दीड जॉब ट्रेनिंगची देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहीती कुलगुरू प्रा.डॉ.दिगंर शिर्के यांनी दिली.
Comments
Post a Comment