मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाळ मुक्त धरण जल युक्त शिवार योजनेचा केला शुभारंभ.

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाळ मुक्त धरण जल युक्त शिवार योजनेचा केला शुभारंभ.              

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी आपल्या मुळ गावी  दरे येथे दाखल झाले असुन त्यांनी गावातच जनता दरबार भरवून आलेल्या नागरीकांच्या समस्यांचा निपटारा करत  शेतीत रमत वक्षांची लागवड केली गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ केला.जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ कोयना जलाशयामध्ये गाळाची भर आधीक होऊ लागली असुन हि सुपीक गाळ युक्त माती शेतीला अधिक उपयुक्त असुन शेतकर्‍यांनी हा गाळ माती काढुन आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधीक बळ मिळेल तर धरणातील गाळ माती कमी होऊन पाणी साठ्यात वाढ होईल त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुंख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला कांदाटी खोऱ्यातील युवकांच्या रोजगारासाठी व्हिजन तयार करा मुंख्यमंत्री यांनी जिल्हाप्रशासनाची बैठक घेऊन कांदाटी खोऱ्यासह या विभागातील युवकांना रोजगारासाठी शहराकडे जावे लागु नये यासाठी वनऔषधी पर्यटन बांबुलागवड मत्स्य व्यावसाय शेतीतील विविध प्रयोगांसाठी व्हिजन तयार करून आराखडा तयार करावा येथील रस्ते पुलांची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या आहेत गावात मुंख्यमंत्र्या समवेत पदाधीकारी आधीकार्यांसह नागरीकांची मांदीयाळी मुंख्यमंत्र्या सोबत विविध खात्यांचे सचिव जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पोलिस प्रमुख समीर शेख आमदार महेश शिंदे यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह हाजारो नागरीकांनी दरे या दुर्गम आणी छोट्याश्या गावामध्ये हजेरी लावल्याने गावाला वर्षा निवासस्थाना सारखे स्वरूप प्राप्त झाले असुन मुंख्यमंत्री रविवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.