बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा लाभ घ्यावा :आशिष बैसवारे.

बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा लाभ घ्यावा :आशिष बैसवारे. 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

कातळगेवाडी येथें स्टेट बँकेचा ग्राहक ,शेतकरी व सर्व नागरीकांनी स्टेट बँक मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय व सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा . सध्या अपघाताचे प्रमाण पाहता सर्वाना विमा गरजेचा आहे  .बँकेने ग्राहक सेवा केंद्रा मार्फत आपल्या अनेक सेवा सुरू केल्या आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया चे पुसेगाव व निढळ येथे ग्राहक सेवा केंद सुरू आहे.त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा .या केंद्रात नवीन खाते उघडणे ,पैसे भरणे ,पैसे काढणे ही कामे केली जातात. ही केंद्र अधिकृत आहेत . स्टेट बँके मार्फत सुरू असलेल्या शेतकऱ्यां साठी  असणाऱ्या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा  असे   शाखाधिकारी आशिष बैसवारे यांनी सांगितले.स्टेट बँक ऑफ इंडिया  व ग्रामस्थ यांचे वतीने  कातळगेवाडी ता खटाव येथे ग्राहक मेळावा संपन्न झाला .यात स्टेट बँकेच्या सामाजिक सुरक्षा योजनेची माहिती देण्यात आली. तसेच ग्राहकांच्या शंका व प्रश्नांना उत्तरे देण्यात आली  प्रास्ताविक विलास कुलकर्णी यांनी केले .यावेळी शाखाधिकारी आशिष बैसवार,सि एस पी (बँक मित्र) निलेश घाडगे पुसेगाव ,प्राची कुलकर्णी निढळ  
सोपान जगदाळे ,नामदेव जाधव, बँक ऑफ महाराष्ट्र  प्रतिनिधी दत्तात्रय जाधव,गोपीचंद जाधव,श्रीकृष्ण जाधव,नरेंद्र जगदाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.