रक्तदान शिबिर च्या माध्यमातून आम्ही सातारकर सामाजिक संस्था चा उपक्रम सर सेनापती संताजी घोरपडे यांना अभिवादन.

रक्तदान शिबिर च्या माध्यमातून आम्ही सातारकर सामाजिक संस्था चा उपक्रम सर सेनापती संताजी घोरपडे यांना अभिवादन.

 विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

 आम्ही सातारकर सामाजिक संस्था . या संस्थेमार्फत खूप सारे उपक्रम राबवले जातात.  सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या 326 व्या पुण्यतिथी निमित्त आम्ही सातारकर सामाजिक संस्था आणि श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान (हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य )भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते .रक्तदान शिबिर साठी आप्पा  घोरपडे यांचे चांगले सहकार्य लाभले. यशस्वी शिबिरामध्ये ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना पाच लाखाचा एक वर्षाचा अपघाती विमा देण्यात येणार आहे.या रक्तदान शिबिरासाठी आणि आरोग्य शिबिर साठी सामाजिक क्षेत्रामधील विविध मान्यवर हजेरी लावली आणि अनोख्या रक्तदान शिबिर चे अभिनंदन केले. रक्तदान शिबिर साठी आम्ही सातारकर सामाजिक संस्था मधील सर्व पदाधिकारी सभासद इतर सर्व यांनी खूप छान पद्धतीने सहकार्य केले . रक्तदान करणाऱ्यांमध्ये महिलांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग होता. रक्तदान केले त्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.दहावी आणि बारावी मध्ये ८०% पेक्षा मार्क पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे विजय दादा निकम यांनी आभार मानले.आम्हीसातारकर सामाजिक संस्था यांनी हे यशस्वी करण्यासाठी सुंदर नगर हाउसिंग सोसायटीचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.