विद्यार्थ्यांचे वाजत गाजत प्रभातफेरी काढून नवागातांचे शाळेमध्ये स्वागत.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
निढळ- रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय निढळ तालुका खटाव येथे सन 2023 24 शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी वर्ग सजावट व शाळा सजावट करण्यात आली होती गावातून प्रभात फेरीने कार्यक्रमास सुरुवात झाली प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमापूजनाने नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन नवागातांचे स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी गोड खाऊचे वाटप करण्यात आले विद्यालयातील उपशिक्षक जाधव आर एन यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला विद्यालयाचे मुख्याध्यापक निर्मळ जे एस यांनी विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन उपस्थितांचे व नवागतांचे स्वागत केले.
यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य प्रशांत घाडगे संतोष खुस्पे शशिकांत दळवी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य लक्ष्मण शिंगाडे सौ स्वाती जाधव सौ रूपाली इंजे शिक्षक पालक संघाचे सदस्य नारायण सत्रे राजाराम घाडगे विद्यालयातील शिक्षक सेवक ग्रामस्थ पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते श्री कांबळे एस एन यांनी सूत्रसंचालन केले श्री काटकर ए एम यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment