कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पदभार स्वीकारला; कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही.
कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पदभार स्वीकारला; कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव येथे कार्यालय असलेल्या सातारा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजेंद्र धैर्यशील शेळके यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. कोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व उपनिरीक्षक विजय जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजेंद्र शेळके हे लोणंद, तालुका खंडाळा येथील रहिवासी आहेत. नुकतीच त्यांना पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे.१९९२ बॅचचे ते पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी विविध ठिकाणी उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक म्हणून उत्कृष्ठ कामकाज केले आहे. शुक्रवारी दुपारी ते सातारा पोलीस मुख्यालयात हजर झाले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतल्यानंतर ते कोरेगावात दाखल झाले. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा पोलीस दलामार्फत कारभार केला जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, अशी ग्वाही राजेंद्र शेळके यांनी दिली.
Comments
Post a Comment