बेल्जियम देशातील नागरिकांना पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी निढळ गावात दाखल

बेल्जियम देशातील नागरिकांना पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी  निढळ गावात दाखल.


पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

निढळ ता खटाव येथे बेल्जियम देशातील महिला निढळ च्या पाणलोट चा अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या .त्यावेळी त्यांनी निढळ च्या पाणलोट कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. आणि पाणलोट विकास पाहून त्या प्रभावित झाल्या .माथा ते पायथा पाणलोट विकासाच्या कार्यक्रमाची त्यानी पाहणी केली .श्रमदानातून निर्माण केलेले पाण्याचे काम त्याना विशेष वाटले.ग्रामीण भागातील सर्व अत्याधुनिक सुविधा असलेली हनुमान विद्यालय निढळ ची इमारत त्यानी पाहिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगुज केले .तसेच निढळ चे वैभव असलेले नीलकंठेश्वर महादेव मंदिर व मंदिराचा गार्डन परिसर त्यानी पाहिला .मानवी जीवनात ज्ञान ,संस्कार गरजेचा आहे.त्यामुळे मुलांनी ज्ञान घ्यावे. संस्कार घ्यावे. भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. त्याचा अभ्यास करावा. आम्ही परदेशी नागरिक भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी ,अभ्यास करण्यासाठी भारतात येत असतो .दुभाषी म्हणून प्रदीप खुस्पे यांनी काम केले .यावेळी यशवंत जाधव ,भिमराव माने,विष्णू पवार,दिनकर खुस्पे ,शशिकांत दळवी,शुभम घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.