क्रेडाईच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे ,उपाध्यक्षपदी जयंत ठक्कर यांची निवड.

क्रेडाईच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे ,उपाध्यक्षपदी जयंत ठक्कर यांची निवड.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील संघटना कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (क्रेडाई ) महाराष्ट्र अध्यक्षपदी (ईलेक्ट) बारामतीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल तावरे यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी वर्ष २०२५-२०२७ साठी कार्यरत राहील.उपाध्यक्षपदी जयंत ठक्कर (सातारा), सुनील कोतवाल (नाशिक), अनिश शाह (जळगाव), दिनेश ढगे (अकोला), आदित्य जावडेकर (पुणे), विद्यानंद बेडेकर(कोल्हापुर) , शशीकांत जीद्दीमनी  सोलापुर) यांची तर सुरेंद्र भोईटे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.'क्रेडाई महाराष्ट्र' ही महाराष्ट्रातील रियल इस्टेट डेव्हलपरची शिखर संस्था असून महाराष्ट्रातील एकूण ६६ शहरातील संघटना या संस्थेची संलग्न आहेत. ही क्रेडाई संस्था महाराष्ट्रातील ग्राहक, बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी व शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये योगदान देत असते. प्रफुल्ल तावरे यांच्या माध्यमातून या संस्थेच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच बारामतीला मिळालेला आहे.क्रेडाई महाराष्ट्र महारेरा या नियमक मंडळाची एसआरओ म्हणून काम करीत आहे. महाराष्ट्रातील डेव्हलपर्सना रेरा रजिस्ट्रेशन व इतर संलग्न विषयावर मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. तसेच क्रेडााई महाराष्ट्र जीएसटी, महसूल, नगर विकास अशा अनेक विषयांवर डेव्हलपर्सना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे क्रेडाईचे आतापर्यंतचे अध्यक्षपद विचारत घेता जिल्हा आणि मोठ्या शहरातील बांधकाम व्यवसायिकांनाच मान मिळाला आहे, आज पर्यंत तालुका स्तरावर प्रथमच क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.दरम्यान, बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यावर येणाऱ्या काळात विशेष प्रयन्त करण्यात येतील. तसेच संघटनेच्या विस्तारासाठी नवी कार्यकारिणी प्रयत्नशील असेल अशी माहिती श्री. तावरे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.