२३ हजार ७७८ कोटींची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत..
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत..
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
२००९-१४ दरम्यान महाराष्ट्राला रेल्वेसाठी दरवर्षी १,१८१ कोटी रुपये मिळत होते, तर आता ही तरतूद २० पट अधिक आहे. २०१४ ते २०२५ दरम्यान दरवर्षी १९१ किमी नवे रेल्वे मार्ग विकसित झाले, यापूर्वी हे प्रमाण फक्त ५८ किमी होते. विद्युतीकरणात मोठी प्रगती होऊन ३,५८६ किमी रेल्वे मार्ग पूर्णतः विद्युतीकरण झाले. तसेच २,१०५ किमी नवे रेल्वे मार्ग बांधले, जी लांबी मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कइतकी आहे.
राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प आणि सुधारणा
•४७ प्रकल्पांमध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक असून ६,९८५ किमी मार्गाचे काम सुरू आहेत.
•केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 'डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी' चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे.
•‘कवच’ सुरक्षा प्रणाली ४,३३९ किमी मार्गासाठी कार्यान्वित केली जाणार असून ५७६ किमी कार्यान्वित किमी यंत्रणा कार्यान्वित आहे.
•१,०६२ उड्डाण पूल व भुयारी मार्ग, २३६ लिफ्ट, ३०२ एस्कलेटर, ५६६ स्थानकांवर वायफाय सुविधा.
•११ जिल्ह्यांसाठी वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू.
या प्रगतीमुळे प्रवाशांना उत्तम सुविधा, जलद मालवाहतूक आणि महाराष्ट्र रेल्वे नकाशावर एक सशक्त राज्य म्हणून उभे राहिले आहे.
Comments
Post a Comment