भाजपा सदस्याता महाअभियान पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटना कार्यशाळा कोल्हापूर येथे संपन्न.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित भाजपा सदस्यता महा अभियान 2025 भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटन पूर्व कार्यशाळेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूर येथे संपन्न झाली.या कार्यशाळेस उपस्थित राहिलो.याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे भाऊ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अतुल भोसले, प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार सदाभाऊ खोत, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार राहुल अवताडे, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, धैर्यशील दादा कदम जिल्हाध्यक्ष सातारा, महेश बाबा जाधव, सुरेश तात्या पाटील यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment