मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर. आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून फलटण आगारास वीस बसेस मंजूर त्यापैकी दहा बसेसचे आगारात आगमन.
मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर. आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून फलटण आगारास वीस बसेस मंजूर त्यापैकी दहा बसेसचे आगारात आगमन.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण दि.14.2.2025 रोजी मा. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सहकार्याने फलटण बसआगारा करिता तब्ब्ल 20 बसेस मंजूर करून घेतल्या असून त्या पैकी 10 बसेस चे फलटण आगारामध्ये आगमन झाले आहे. त्या बसेसचे पूजन व लोकार्पण आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी खाजदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.पाच ग्रीन बसेस व दहा डिझेल बसेस फलटण तालुक्यातील नागरिकांच्या सेवेकरिता तातडीने दाखल होतील त्याचबरोबर आगामी काळात देखील फलटण आगारचे रूप लवकरच बदलेले असणार असे आव्हान यावेळी माजी खाजदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी एसटी महामंडळाच्या सातारा उपप्रमुख ज्योती गायकवाड. आगार प्रमुख राहुल वाघमोडे. आगार उपप्रमुख धीरज अहिवळे. युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर.तुकाराम शिंदे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे. मार्गदर्शक नेते डि.के.पवार. गटनेते अशोकराव जाधव. नगरसेवक सचिन अहिवळे. भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे. भाजप तालुकाध्यक्ष अमोल सस्ते. शिवसेना तालुका अध्यक्ष इवरे. शेहर तालुकाध्यक्ष अनुपजी शहा. त्याचबरोबर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते. फलटण आगारातील सर्व कर्मचारी व प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment