गोखळीचे माजी सरपंच मनोज उर्फ तात्या गावडे व उपसरपंच अभिजित जगताप यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण-तालुक्यातील पूर्व भागाचे युवा नेते तथा गोखळीचे तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच- मनोज (तात्या) गावडे व उपसरपंच-अभिजित जगताप यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेश केल्याने राजे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, श्री विलासराव नलवडे, श्री धनंजय दादा साळुंखे पाटील, श्री अभिजीत भैया नाईक निंबाळकर, श्री अशोकराव जाधव, श्री जयकुमार शिंदे,श्री महादेवराव पोकळे, श्री सचिन अहिवळे, श्री तुकाराम आबा शिंदे, श्री बाबु मामा शिंदे श्री पिंटू ईवरे, श्री विशाल माने- देशमुख, श्री रणजित शिंदे, शिराज भाई शेख, श्री अमित रणवरे , सिराज भाई शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment