राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य खामकरला सुवर्ण पदक.

राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य खामकरला सुवर्ण पदक.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

पुसेगाव, ता. १९ : बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय शेंद्रेचा माजी विद्यार्थी व सध्या प्रतिभा निकेतन उच्य-माध्यमिक विद्यालय मुरुम, येथे शिकत असलेल्या आदित्य विजय खामकर या विद्यार्थ्याने सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर आर्यन बिराजदार व अर्जुन बिराजदार यांच्या साथीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. आदित्यच्या या यशाबददल राष्ट्रीय कुस्ती संघाचे  प्रशिक्षक जितेंद्र कणसे, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष कृष्णात फडतरे, मार्गदर्शक श्रीकांत वाड, शिक्षक, प्रशिक्षक व आदींनी त्याचे व सर्व टीमचे अभिनंदन केले. या टीममधील खेळाडूंची चेन्नेई येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 


Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.