संजयकाका पाटील यांच्या प्रचारात ठामपणे मैदानात -एड. स्वप्नीलभैया पाटील.
भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदिनिशी संजय काकाच्या पाठीशी
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने,नवे कार्यकर्ते असतील, संजयकाका पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी झटण्याचे आवाहन तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष एड. स्वप्नील भैया पाटील यांनी सावर्डे येथे बोलताना केले. ते सावर्डे येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ इतर तालुक्यातील मतदार संघाच्या तुलनेत 35 वर्षे मागे गेला आहे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक बाबतीत मागे पडलेला आहे. येथील अपयशी लोकप्रतिनिधी मुळे मतदार संघातील जनतेला हाल अपेष्टाला सामोरे जावे लागत आहे. मतदारसंघात सगळा पोरखेळ चाललेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय आपल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. फक्त श्रेय घेण्याचे काम चालू आहे या ठिकाणी सर्व जुन्या जाणत्या नेत्यांना एकत्रित घेऊन एक प्रगल्भ नेतृत्व मतदार संघाला देण्याची गरज आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व माजी खासदार संजय काका पाटील यांचे मनोमिलन करण्यासाठी पुढाकार घेतला. या दोघांच्या मनोमिलानामुळे आता महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा विजय सुकर झालेला आहे.राज्यात भाजपा राष्ट्रवादी शिवसेना, आर पी आय चे महायुती सरकार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा सुटलेली आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांना तिकीट मिळाले आहे. त्यांच्या पाठीशी भाजप प्रचारात ताकदनिशी उतरणार आहे. राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा काकांना होणार आहे. संजय काका आमदार झाल्यानंतर तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील सर्व पाणी योजना, विकास कामे गती घेतील, अशी आशा आहे.या मेळाव्यास पै . संभाजी तात्या पाटील,दिलीप पाटील, इंद्रनील पाटील, निशिकांत पाटील, विठ्ठल निकम तसेच ग्रामपंचायत व विकास सोसायटीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment